रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय
एम. एच. हायस्कूलच्या रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना १९७५ साली जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, दादर यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली. स्थापनेपासून एम. एच. हायस्कूल रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालयाने अध्यापनाचा उच्च दर्जा राखला. ज्याचा परिणाम म्हणून एम. एच. हायस्कूल रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालयाने हजारो अभियंते, डॉक्टर, आर्किटेक्ट तसेच सर्व विविध व्यवसायांमध्ये उच्च विद्याभुषित यशस्वी व्यावसायिक निर्माण केले. एम.एच. हायस्कूल रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालयांचा प्रवेश कट ऑफ या भागात तुलनात्मक दृष्ट्या नेहमीच अधिक आहे. शिक्षणाचा दर्जा, सुसंस्कृत वातावरण तसेच सर्वांगीण उन्नतीकडे जाणीवपूर्वक पुरवलेले लक्ष या बाबींमुळे आमच्या कनिष्ठ महाविद्यालयास पालक आणि विद्यार्थी सर्वाधिक प्राधान्य देतात.
अभ्यासक्रम - सिलॅबस
एम. एच. हायस्कूल रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय हे ठाणे रेल्वे स्थानकाजवळ पश्चिमेला (अंदाजे ५ मिनिटे चालत) आहे. शिवाजी पथ येथे कल्याण ज्वेलर्स, ठाणे पश्चिम – ४00६0१ च्या समोर महाविद्यालयाची सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज इमारत आहे. एम.एच. हायस्कूल व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालयात सुसज्ज लायब्ररी, विशेष वाचन कक्ष, अत्याधुनिक सुविधायुक्त भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र जीवशास्त्र प्रयोगशाळा, इलेक्ट्रॉनिक्स, एमएलटी, संगणक प्रयोगशाळा, माहिती तंत्रज्ञान प्रयोगशाळा तसेच विद्यार्थ्यांचे शारिरिक स्वास्थ्य राखण्याच्या दृष्टीने व्यायामशाळा आणि स्वच्छ व आरोग्यदायी सुविधायुक्त कॅन्टीन तसेच सांस्कृतिक उन्नतीसाठी सभागृह इ. अनेक सुविधा महाविद्यालयात उपलब्ध आहेत.
काळानुरुप विद्यार्थ्यांच्या गरजा, मागण्या आणि निधी उपलब्धतेनुसार या सोयीसुविधांमध्ये दर्जेदार वाढ करण्याप्रती व्यवस्थापन सजग आहे.
पाऊलखुणा व वैशिष्ट्ये
- स्थापना १९७५ सायन्स व कला विभाग सुरुवात
- प्रत्येक तुकडी शिक्षक संख्या १४ ते १५
- महाविद्यालयात विद्यार्थ्यांना जीवशास्त्र ऐवजी टेक्निकल विषय घेण्याची सवलत
- श्री. तामरस उपप्राचार्य असताना माहिती तंत्रज्ञान उर्फ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) विषयाला सुरुवात, ६० विद्यार्थ्यांची आयटी विषयाची तुकडी होती.
- २००७-२००८ नंतर श्री राजपूत सर प्राचार्य असताना संगणक विषयाला सुरुवात, २५ विद्यार्थी संख्या नंतर ५० विद्यार्थी त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स विषयाला सुरुवात.
- संगणक / इलेक्ट्रॉनिक्स विषयांचा (२०० मार्क्स संगणक | २०० मार्क्स इलेक्ट्रॉनिक्स) पर्याय निवडणार्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र / मराठी / हिंदी विषय देण्याची आवश्यकता नाही.
सध्या,
- संगणक विषयासाठी १०० विद्यार्थी असुन त्यात ४० अनुदानित व ६० विनाअनुदानित आहेत.
- इलेक्ट्रॉनिक्स विषयासाठी ५० विद्यार्थी असुन त्यात २६ अनुदानित व व २४ विनाअनुदानित आहेत.
- इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयासाठी सायन्स व वाणिज्य मिळून १२० विद्यार्थी आहेत.
- टेक्निकल इलेक्ट्रिकल मेंटेनन्स व मेकॅनिकल मेंटेनन्स विनाअनुदानित व अनुदानित मिळून ३० विद्यार्थी आहेत.
सुविधा
- फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, सीएस, इएस व आयटी या सर्व विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध आहे.
- फिजिक्स केमिस्ट्री प्रयोगशाळेत एका वेळेस ६० विद्यार्थी प्रॅक्टिकल्स करू शकतात.
- बायोलॉजी प्रयोगशाळेत ४० विद्यार्थी प्रयोग करू शकतात.
कंम्प्युटर सायन्स CS प्रयोगशाळेत ४० विद्यार्थी एका वेळेस प्रयोग करू शकतात. - इलेक्ट्रॉनिक्स प्रयोगशाळेत २५ विद्यार्थीी एका वेळेस प्रयोग करू शकतात.
- अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडते.
- विज्ञान (सायन्स) विभागासाठीचा कटऑफ हा सर्वात जास्त, म्हणजेच अनुदानित सायन्स विभाग ९६% ते ९७% व विनाअनुदानित विभाग ९४% ते ९५% असा असतो.
- बारावीनंतर बरेचसे विद्यार्थी आयआयटी ला प्रवेश घेतात तसेच नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन मेडिकल साठी प्रवेश घेतात.
- असंख्य विद्यार्थी ‘पॅरा मेडिकल’च्या मेडिकल कोर्स साठी ॲडमिशन घेतात.
कॉलेजमधील विद्यार्थी गुणवंत आहेतच, त्याचबरोबर शिक्षकदेखील विद्यार्थ्यांसाठी मेहनत घेतात, ज्याच्या फलस्वरूप दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांना गणित, फिजिक्स, केमिस्ट्री या विषयात शंभरापैकी शंभर गुण प्राप्त होतात.
बरेचसे शिक्षक मॉडरेटर तसेच काही एक्झामिनर आहेत. - डॉक्टर राजेंद्र गव्हाणे यांनी यावर्षी चीफ मॉडरेटर म्हणून बोर्डाचे काम बघितले.
सर्व शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीमध्ये मदत होते. - सायन्स विद्यार्थ्यांना वैद्यकीय / अभियांत्रिकी शाखांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक NEET / CET (नीट व व सीईटी) साठी आवश्यक मार्गदर्शन केले जाते.
- आर्ट्स – कॉमर्स विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते.
विविध तज्ञ शिक्षकांना बोलावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. - विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
- नवरात्रात माननीय प्राचार्या सौ. निलांबरी जठार मॅडम यांच्या मार्गदर्शनाने शारदोत्सवाची सुरुवात झाली.
- ज्या विद्यार्थ्याला / विद्यार्थिनीला दहावी मध्ये ५०० पैकी ५०० गुण मिळालेले असतात, अशा विद्यार्थिनीच्या हस्ते षोडशोपचारे सरस्वती पूजन केले जाते तसेच त्या विद्यार्थी / विद्यार्थिनीच्या पालकांनाही निमंत्रण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सहभागाने दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
- दरवर्षी डिसेंबर महिन्यात ‘मोहोर’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाची सुरुवात माननीय प्राचार्य श्री. राजपूत सर यांच्या कालावधीत झाली.
- विद्यार्थ्यांचा फॅशन शो तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी प्रसिद्ध मराठी कलावंतांना शाळेत बोलावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पारितोषिके दिले जातात.