Back

Medical Laboratory Technician

(प्रयोगशाळा तंत्रज्ञ)

      मो. ह. विद्यालयामध्ये १९९०-९१ या वर्षी +२ स्तरावरील किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन M. L. T. हा सुरू करण्यात आला आहे.

सदर अभ्यासक्रम सुरू करण्याची उद्दीष्टे :-

      शालान्त परिक्षा उत्तीर्ण होणार्‍या मुला-मुलींपैकी फार कमी प्रमाणात मुले-मुली महाविद्यालयीन तसेच उच्चशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. विविध कारणांमुळे ज्यांना अशी संधी मिळू शकत नाही, अशा मुलामुलींना व्यवसाय शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनविण्याच्या हेतूने केंद्रशासनाने नविन शैक्षणिक धोरणामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर व्यवसाय शिक्षण देण्याच्या दृष्टीने सदर अभ्यासक्रम तयार केला आहे.

एमएलटी -मेडिकल लॅब टेक्निशियन कोर्स वैशिष्ट्ये :-

  • सध्या अकरावीत तीस विद्यार्थी व बारावीत तीस विद्यार्थी सदर अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत आहेत.
  • विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध आहे.
  • बारावीनंतर एमएलटी विद्यार्थ्यांना पॅथॉलॉजी लॅब मध्ये जॉब उपलब्ध होतात.
  • अनेक विद्यार्थी ठाण्यात, कल्याण, डोंबिवली मध्ये पॅथॉलॉजी लॅब किंवा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.
  • एमएलटी च्या विद्यार्थ्यांना पॅथॉलॉजी लॅब व जॉब बद्दल अद्ययावत माहिती (Updated Information) दिली जाते.

अभ्यासक्रम - सिलॅबस

व्यवसाय अभ्यासक्रमास लागणारी पात्रता

व्यवसाय अभ्यासक्रमाचे महत्त्वाचे पैलू

अभ्यासक्रमानुसार व्यवसायाची संधी

(मेडीकल लॅबोरेटरी टेक्निशियन - M. L. T.)

What our Past Students say?

Opportunities don't happen, you create them.

Chris Grosser