महत्त्वपूर्ण घटना
२ नोव्हेंबर १८९२
कै. गोपाळ नारायण अक्षीकर यांनी कै. केशव भगवंत ताम्हणे यांच्या सहकार्याने ठाणे येथे टेंभी नाक्यावर बी. जे. हायस्कूल शेजारच्या इमारतीत एक खाजगी मिडल स्कूल सुरू केले. तेंव्हाच नाव 'ठाणा मिडल स्कूल'.
१९ फेब्रुवारी १८९४
शाळेस मान्यता, त्यावेळी शाळेचे ‘ठाणे इंग्लिश स्कूल’ असे नाव
१९२२ साल
नगीनदास ठाणावाला आणि ज. ए. इ. मध्ये करार होऊन शाळेचे ‘मोतीलाल हरगोविंददास विद्यालय’ (मो. ह. विद्यालय) असे नामकरण
- ९ विद्यार्थ्यांची पहिली तुकडी मॅट्रिक्युलेशन परीक्षेस बसली
खारकर आळीच्या टोकाला, खाडी किनारी, 'ठाणावाला इस्टेट' मध्ये शाळा भरू लागली.
१९४२ साल
जागा अपुरी पडू लागल्याने प्रभात सिनेमा समोर संस्थेने सध्याची इमारत असलेली जागा ३५०० चौरस मीटर विकत घेतली व शाळेची इमारत उभी राहिली.
१९४५-४६
खारकर आळीतील वर्ग १९४५-४६ मध्ये बंद करण्यात आले, आणखी काही वर्षांनी फुलवाडी येथे खोल्या भाड्याने घेऊन शाळेचे काही वर्ग तिकडे भरु लागले.
१९५५ साल
प्रभात सिनेमा समोरच्या इमारतीवर दुसरा मजला बांधण्यात आला.
१९५९ साल
शाळेसाठी प्रशस्त क्रीडांगण असावे या उद्देशाने संस्थेने नगरपालिकेकडून १५०० चौरस मीटरचा प्लॉट विकत घेतला
- शाळेमध्ये असलेल्या सभागृहाचे प्रयोगशाळेत रूपांतर
- फुलवाडीतील सर्व वर्ग बंद होऊन संपूर्ण शाळा एकाच इमारतीत
१९६६ साल
१ नोव्हें १९६६ ते २ नोव्हें १९६७
शाळेचे अमृत महोत्सवी वर्ष थाटात साजरे
१९६७ साल
फुलवाडीतील वर्ग बंद करण्यात आले.
१९७५ साल
शाळेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले
१ जुलै १९७५
अभिरुची मंडळाची स्थापना
१९८६ ते १९८९
तळमजला अधिक दोन मजली अशी सुसज्ज २६ खुल्या
स्वतंत्र प्रयोगशाळा, ग्रंथालय, चित्रकला कक्ष असलेली इमारत बांधून पूर्ण
१९९१ फेब्रुवारी
२ नोव्हें. १९९१ ते २ नोव्हें. १९९२
भव्य शतक महोत्सव
२००१ - २००२
२ नोव्हें. २००१ ते २ नोव्हें. २००२
शतकोत्तर दशकपूर्ती वर्ष साजरे
शाळेच्या ग्रंथालयास गुरुवर्य स. वि. कुलकर्णी यांचे नाव
फेब्रुवारी २०१६
शाळेच्या नवीन हॉलचे उद्घाटन शिक्षण मंत्री माननीय श्री. विनोद तावडे यांच्या हस्ते
शाळेच्या ग्रंथालयास गुरुवर्य स. वि. कुलकर्णी यांचे नाव
२०१६ - २०१७
२ नोव्हें. २०१६ ते २ नोव्हें. २०१७
शतकोत्तर रौप्य महोत्सव भव्य प्रमाणात साजरा
रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून शाळेत क्रीडा प्रबोधिनी सुरू
२०१७ साल
CBSE अभ्यासक्रमाची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू
132
शाळेस पूर्ण वर्षे
150000
आजी-माजी विद्यार्थी
125
कार्यरत शिक्षक - शिक्षिका
मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम