Back

बातम्या

प्रजासत्ताक दिन सोहळा

26 जानेवारी, 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी मो. ह. विद्यालयात उत्स्फूर्तपणे शाळेच्या एम. एल. डी. विभागाच्या प्रमुख सौ.अनिता जाधव मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक. मा. श्री. विकास पाटील सर व उप. प्रा. कुलकर्णी मॅडम, पर्य. श्री. घोलप सर सीबीएससी च्या – मुख्याध्यापिका सौ. श्वेता झाडे मॅडम, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व संचालक सदस्य श्री. सुनील पाटील सर, संस्थेच्या संचालिका सौ. स्नेहा शेडगे मॅडम व प्रमुख पाहुणे मो. ह. वि. चे माजी विदयार्थी 1971 च्या बॅचचे ओनर ऑफ द ऑस्ट्रेलिया पुरस्कृत आदरणीय श्री. विजय जोशी सर, तसेच शाळेचे आजी -माजी शिक्षक, शिक्षकेतर वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेझीम, रींग रिम्स, मल्लखांब, देशभक्तिगीते गाऊन मोठ्या उत्साहाने प्रभात फेरी काढण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. धनकुठे मॅडम यांनी केले.

मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम