डॉ. सतिश वसंत वैद्य
एम.डी. मेडीसीन; एम.डी. कॅर्डियॉलॉजी; १९८५ फेलोशिप ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ चेस्ट फिजीशीयन्स् प्राप्त. (एफ.सी.सी.पी.)
जीवदान व विद्यादान हेच ब्रीदवाक्य !
२०१७ नवरत्न पुरस्कार प्राप्त
२०१९ ज्येष्ठ नागरिक सेवारत्न पुरस्कार प्राप्त
- १९८१ पासून आजपर्यंत ठाण्यात हृदयविकारतज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय (४२ वर्ष) तसेच ठाणे येथील ज्युपिटर व मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयांशी सुरुवातीपासून हृदयविकारतज्ञ म्हणून संलग्न.
- हृदयविकार या विषयावरील पदवी प्रप्त करुन व्यवसाय सुरु करणारे ठाण्यातील प्रथम डॉक्टर.
- First qualified Cardiologist of the City of Thane.
- १९८५ पासून २०१४ पर्यंत स्वत:चे दहा खाटांचे अद्ययावत रुग्णालय व आय. सी. सी. यू.
- १९८३ ग्रांट वैद्यक महाविद्यालय येथे मानसेवी प्रध्यापक (हृदयचिकित्सा विभाग) आणि सर जे. जे. रुग्णालय येथे मानसेवी हृदयविकारतज्ञ म्हणून नेमणूक व २००७ साली सेवानिवृत्त.
- २००८ पासून २०२० पर्यंत पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील येथे ह्दयविकार विभागामध्ये प्रध्यापक व डी. एम्. कार्डियॉलॉजी, पदवीसाठी मार्गदर्शक व परीक्षक व २०२० साली सेवानिवृत्त.
- १९९० ते २००७ डी. एम्. कार्डियॉलॉजी पदवीसाठी मार्गदर्शक व परीक्षक, मुंबई विश्वविद्यालयाशी संलग्न.
- स्वत:चा खासगी वैद्यकीय व्यवसाय सांभाळून पदवीयुत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्या फार थोड्या डॉक्टर्सपैकी एक.
- हृदयविकारावरील अँजीओग्राफी व २ डी एको व कलर डॉप्लर यासारख्या चाचण्यांमध्ये खास नैपुण्य व अनुभव तसेच अँजीओप्लास्टी व पेसमेकर्स या सारख्या उपचार पध्दतीमध्ये विशेष कौशल्य व अनुभव.
- वर नमूद केलेल्या चाचण्या व उपचार पध्दती यांचा लाभ हाताखाली शिक्षण घेतलेल्या शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना मिळाला असून ते सर्व जगभर प्रथितयश हृदयविकारतज्ञ म्हणून व्यवसाय करीत आहेत.
- या व्यतिरिक्त अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हृदयविकार परिषदांमध्ये सहभाग (भाषण, चर्चासत्र व केस प्रेंजेंटेशन इ.).
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालीकांमध्ये लेख आणि वैद्यकीय पुस्तकांमध्ये धडे (चॅप्टर) प्रसिध्द झाले आहेत.
- हृदयविकारांवरील कॅप्स व लोकशिक्षण चर्चासत्र यांचे आयोजन.
- अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोशिएशन, ठाणे – १ वर्षे.
- अध्यक्ष, असोशिएशन ऑफ फिजीशीयन्स ऑफ इंडिया, ठाणे – ४ वर्षे
हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु!
मोह सुविचार