Back
manbindu

डॉ. हेमचंद्र प्रधान

संशोधक शास्त्रज्ञ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शालांत परीक्षेत राज्यात सर्वप्रथम (1961), मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्रातून एच. एस. सी. (1965), आणि एम. एस. सी. (1967).

वयाच्या पंचविशीपूर्वीच (1971) अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या जगातील मान्यवर विद्यापीठातून सैद्धान्तिक न्यूक्लिअर फिजिक्स या विषयात डॉक्टरेट मिळवली.

अमेरिकेतील मॅकमास्टर ॲंड विस्कॉन्सिन या नामांकित विद्यापीठात तीन वर्षे संशोधन व अध्यापन

आपल्या मातृभूमीतच आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करून अध्यापनाला वाहून घेण्याच्या प्रशंसनीय अनिवार इच्छेमुळे मुंबईत राम नारायण रुईया कॉलेजमध्ये आणि नंतर Western Regional Instrumental Centre, Mumbai या भारतातील अग्रगण्य संशोधन संस्थेचा भाग असलेल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात संशोधन आणि अध्यापन.

1998 ते 2008 या काळात केंद्राचे अधिष्ठाता आणि 2008 ते  11 पर्यंत केंद्र संचालक. जुलै 2011 मध्ये निवृत्त झाल्यानंतर भारत सरकारच्या राजा रामण्णा संस्थेचे फेलो म्हणून होमी भाभा केंद्रात तसेच मुंबई विद्यापीठाच्या Centre for Excellence in Basic Sciences मध्ये अध्यापन आणि संशोधन. गेल्या तीस वर्षात होमी भाभा केंद्राने अनेक नवनवीन उपक्रम हाती घेतले आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त केली आहे. केंद्राच्या भरभराटीत प्रा. डॉ. प्रधानांचा सिंहाचा वाटा आहे. केंद्राच्या संशोधन, विद्यार्थ्यांचे प्रज्ञा संशोधन गणित आणि विज्ञानाच्या अध्यापकांचे प्रशिक्षण, क्रमिक पुस्तकनिर्मिती आणि विज्ञानप्रसार या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांचा पुढाकार आणि सहभाग राहिला आहे. त्यांच्या कारकिर्दीत केंद्रात उच्च माध्यमिक स्तरावर जागतिक गुणवत्तेच्या प्रयोगशाळा उभारल्या गेल्या. त्यामुळे भारतीय विद्यार्थी ऑलिपियाडच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेऊन चमकू लागले. 1998 मध्ये आईसलँडमध्ये भरलेल्या भौतिकशास्र ऑलिंपियाडमध्ये भारताचे नेतृत्व करण्याचा मान त्यांना मिळाला आहे. भौतिकशास्त्रातील विविध विषयांवरचे साठहून अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

ड. प्रधान हे शिक्षणक्षेत्रात कुशल संघटक, प्रेरक अध्यापक आणि मार्गदर्शक याचबरोबर एक प्रभावी वक्ता म्हणून सुप्रसिद्ध आहेत. विविध विषयांअरील 35 हून अधिक पुस्तकांचे लेखन संपादन त्यांनी केले आहे. विज्ञानावरील शंभराहून अधिक व्याख्याने आणि निरनिराळ्या राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय नियतकालिकात त्यांचे अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे ते 200 वर्ष सदस्य आहेत आणि जीवसृष्टी आणि पर्यावरण या विषयांच्या खंडाचे ते समन्वया आहेत मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष आणि मासिक पत्रिकेचे संपादक होते. Indian Association of Physics या भौतिकशास्त्राच्या शिक्षकांच्या राष्ट्रस्तरीय शैक्षनिक संस्थेचे ते अध्यक्ष होते. जानेवारी 2016 पासून त्यांची या पदावर फेरनिवड झाली आहे.

हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु!

मोह सुविचार