Back

बातम्या

मराठी राजभाषा दिन

ज. ए. इ. चे मो. ह. विद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय , ठाणे

मराठी राजभाषा दिन

“कवितेच्या ओठी
अभिजात मराठी”
मो. ह. विद्यालय, ठाणे व कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे शहर शाखेच्या वतीने आज ‘मराठी राजभाषा दिना’ निमित्त केवणी दिवे, येथे ज्येष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे यांच्या ‘कवितेच्या ओठी… अभिजात मराठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेतील 6 वी ते 9 वी  च्या विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शाळेतील दोन विद्यार्थिनींनी केलेल्या छोट्या नाटिकेने उपस्थित भारावून गेले.

ज्येष्ठ साहित्यिक मा. अरुण म्हात्रे सरांनी पाठ्यपुस्तकातील अनेक कविता गावून दाखवल्या, विद्यार्थ्यानी त्या कवितांवर ताल धरला, व सामुहिक  गायन केले.अभिषेक सुतार या गायकाने अनेक कविता सादर केल्या.

कार्यक्रमास मो. ह. विद्यालयाचे  मुख्याध्यापक श्री. विकास पाटील, कोमसाप शहर अध्यक्ष ॲड. मनोज वैद्य,  संचालक मंडळ सदस्या सौ. स्नेहा शेडगे, सरपंच सौ. मढवी आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.  

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक  कार्यकर्ते  श्री. प्रभीर भोईर  व श्री. कांतिलाल पाटील.यांचे विशेष सहकार्य लाभले.

जय भवानी! जय जिजाऊ!! जय शिवराय!!!