कै. मोतीलाल हरगोविंददास ठाणावाला
प्रेरणास्थान
१९२० साली ठाण्याला शाळा सुरू करणे धाडसाचे होते. बी. जे. हायस्कूल ही ख्यातनाम सरकारी शाळा तेंव्हा ठाण्यात होती.
सुरुवातीला शाळा बी. जे. हायस्कूलच्या शेजारील भाड्याच्या खोलीत भरत असे. तेंव्हा शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ३४ होती. आता ही इमारत अस्तित्वात नाही.
शाळेचे पहिले मुख्याध्यापक म्हणून केशवराव ताम्हणे यांनी काम पाहिले.
ठाणा मिडल स्कूल या नावाने ही शाळा सुरू झाली. सदर जागा अपुरी पडू लागल्याने खाडीजवळ धारकर आळीच्या टोकाला व सध्याच्या ठाणा कॉलेज जवळून जाणार्या क्रिक रोड लगत ठाणावाला इस्टेटमध्ये १९२२ सालापासून भरु लागली. सदर इमारत अजूनही अस्तित्वात आहे.
शेठ नगीनदास ठाणावाला व संस्था यांच्यामध्ये एक करार होऊन शाळेचे नामकरण ‘मोतीलाल हरगोविंददास विद्यालय’ असे करण्यात आले.
१९४२ मध्ये प्रभात सिनेमासमोरील जागेवर मो. ह. विद्यालयाची स्वत:ची दुमजली इमारत उभी राहिली.
नियोजित करार झाल्यामुळे पुढे कायमस्वरुपी शाळेला मो. ह. विद्यालय नाव पडले.