सप्रेम नमस्कार!
२ नोव्हेंबर १८९२ ते २०२३ हा 'मो. ह. विद्यालय'चा १३१ वर्षांचा कालखंड. एका लहानशा शैक्षणिक रोपाचे रूपांतर एका भव्य आधारवडामध्ये झाले आहे.
असंख्य पिढ्यांचे सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक संगोपन या विद्यालयाने केले आहे. असंख्य मान्यवरांच्या भावी आयुष्यातील कर्तृत्वाचे बीज या विद्यालयाच्या संस्कारातून घडले आहे. ज्या विद्यालयाने आपणांस घडविले तेथे पुन्हा जाऊन शालेय जीवनातील आठवणी सांगून, पुन्हा पुन:प्रत्ययाचा आनंद घ्यावा, असे आपणांस वाटते. तसेच शाळेलाही वाटते. परंतु विद्यार्थी संख्या प्रचंड असल्याने प्रत्यक्ष संपर्क होऊ शकत नाही.
विद्यालयाबाबतची आपली सद्भावना गृहित धरून आम्हीं आपणांस शाळेशी संपर्क साधण्याचे आवाहन करत आहोत.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मो. ह. विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी
मो. ह. विद्यालयातील शिक्षकांनी माझ्यात रुजवलेले नेतृत्व गुण, अडचणींना तोंड देण्याची क्षमता, आव्हानांना सामोरे जाण्याची उर्मी, नियोजनातील काटेकोरपणा इत्यादी गुणांमुळेच मी यशस्वी होऊ शकलो.
श्री. सतीश प्रधान
शाळेने वक्तशीरपणाची शिस्तीची जी सवय लावली ती आयुष्यभर उपयोगी पडली . 'कायद्याचे पालन हा संस्कृतीचा एक भाग झाला पाहिजे.', ही शिकवण शाळेने दिली.
श्री. अभय ओक
मो. ह. विद्यालयातील शिक्षकांनी माझं आयुष्य समृद्ध केले.
श्री. हेमचंद्र प्रधान
'विद्यार्थ्यांना बोलते करणारी माझी शाळा.'
आज शहरात अनेक माध्यमांच्या शाळा जरी उभ्या राहत असल्या तरी, मो. ह. शाळा ही सगळ्याच शाळांसाठी आदर्श ठरली आहे. त्यामुळे इथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या शाळेचा सार्थ अभिमान वाटतो.
सौ. संपदा कुलकर्णी
वैद्यकीय क्षेत्र हा व्यवसाय नसून , रुग्णसेवेच्या माध्यमातून 'ईश्वर सेवा 'करण्याची संधी आहे. अशी शिकवण देणारी माझी शाळा!
डॉक्टर श्री. नितीन बुरकुले
शाळा विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतेच पण यापेक्षा 'मी' काहीतरी 'वेगळं 'करू शकतो हा आत्मविश्वास मला मो. ह. शाळेने दिला . 'अपयश आलं तर खचून जायचं नाही, आणि यश आलं तरी हवेत उडायचं नाही.', हे शिकवलं माझ्या शाळेने.
श्री. संजय जाधव
चित्ररम्य आठवणींचा कोलाज म्हणजे माझी शाळा!
श्री. शैलेश साळवी
आयुष्यात घाबरून चालणार नाही, आपण निडर बनायला हवं. उत्तुंग भरारी मारण्याचे बळ माझ्या पंखात केवळ शाळेमुळेच आले.
श्री. राजगोपाल नोग्जा
शाळेत काही वाईट ' उद्योग' केला की शाळेत 'मार' आणि 'शाळेत' मार खाल्ला म्हणून 'घरी' मार! पण, यामुळेच मी घडलो, शाळेनेच मला घडवलं.
डॉक्टर श्री. विजय जोशी
जीवनात आई जशी महत्त्वाची तशी शाळा ही महत्त्वाची आहे. माझ्या आईने जे माझ्यावर संस्कार केले, तसेच संस्कार माझ्या शाळेतील शिक्षकांनी केले. मो. ह. शाळेने नेहमीच विद्यार्थ्यांमधील 'कलावंत 'जागा करण्याचा प्रयत्न केला आहे.
पंडित मुकुंदराज देव
खेळ आणि अभ्यास यांचा उत्तम मेळ साधत येतो, याचा उत्तम वस्तूपाठ मो. ह. विद्यालय आहे.
श्री. नुबेर शेख