Back

बातम्या

शिवजयंती उत्सव

ज. ए. इ. चे मो. ह. विद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय , ठाणे

शिवजयंती उत्सव

राष्ट्रनिर्माता म्हणून मान्यता पावणे यासारखे मनुष्याच्या आयुष्यात अन्य कोणतेही श्रेष्ठ विधीलिखित असूच शकत नाही. नेमके हेच महतकृत्य छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर मराठी माणसांच्या आयुष्याची दिशा वेगळ्याच दिशेने मार्गक्रमण करत गेली असती आणि आजच्या भारताच्या इतिहासालाही एक वेगळेच वळण लागले असते. हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही.
अशा या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे मो. ह. विद्यालय व रमेश परमार ज्युनिअर कॉलेज ठाणे या आपल्या शाळेत दुपारी एक वाजता ग्रंथालयात मोठ्या थाटामाटात, दिमाखात, उत्कृष्ट अशी साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा,पोवाडा, गर्जना , घोषणा ,गाणी, गड किल्ल्यांचे प्रदर्शन इत्यादीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. पालकांनीही आपल्या पाल्यांना मदत केली, उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
ज्योती साटम मॅडम, शिल्पा साटम मॅडम आणि अर्जिता कुलकर्णी यांनी शिवजयंती उत्सवासाठी विशेष मेहनत घेतली आणि सांगितल्याप्रमाणे नियोजित वेळेत अतिशय उत्कृष्ट असा शिवजयंती उत्सव साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जिताने छानच केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. विकास पाटील सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशी गर्जना करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी शाळेचे पर्यवेक्षक श्री. घोलप सर, शाळेचे माजी मुख्याध्यापक आणि संस्थेचे संचालक श्री राजपूत सर , संचालिका शेडगे मॅडम तसेच छबिलदास शाळेचे माजी विद्यार्थी श्री. सावे सरही या कार्यक्रमास उपस्थित राहिले. या सर्वांच्या मुळे आणि शाळेतील सर्व सहकाऱ्यांच्यामुळे अतिशय उत्कृष्ट असा हा शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.त्याबद्दल शाळेतर्फे सहभागी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व पालकांचेही खूप खूप कौतुक.

जय भवानी! जय जिजाऊ!! जय शिवराय!!!