बातम्या
वाट शतकाची, भेट ऋणानुबंधाची !!!
लवकरच आपल्या शाळेतील गणेश हरी पेंडसे सर व श्रीमती उषा केळकर आनंदी जीवनाची शंभरी गाठणार आहेत.
मो. ह. विद्यालयाच्या इतिहासातील हा एक सुवर्णक्षण असणार आहे. त्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट दादरचे मो. ह. विद्यालय रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय व अभिरुची मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्यासाठीच एक सत्कार सोहळा दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी ४ वाजता शाळेच्या सभागृहात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री अभय ओक यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
आपणा सर्वांना आग्रहपूर्वक निमंत्रण .
टीप : कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आपण आपली उपस्थिती कृपया या क्रमांकावर 9869227250 (अविनाश बर्वे) आधीच नोंदवावी.
मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम