Back

सप्रेम नमस्कार

देणगी आवाहन

       १८९२ साली स्थापन झालेल्या आपल्या मो. ह. विद्यालयाची १३३ व्या वर्षाकडे वाटचाल सुरु आहे.

       शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षत शाळेच्या विद्यमान इमारतीवर वाढीव दोन मजले बांधण्यात आले. जुनी इमारत दुरुस्ती करणे, E-learning, L. D. Projection, Smart board, सुसज्ज वातानुकूलीत ग्रंथालय, क्रीडाकक्ष, शाळेची रंगरंगोटी, अनेक वर्गांचे सुशोभिकरण, प्रशस्त हॉल, भव्य आधुनिक सुसज्ज प्रयोगशाळा, शिक्षककक्ष, कार्यालय, मुख्याध्यापक कक्ष, कॉन्फरन्स हॉल इ. नुतनीकरण अशा अनेक शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या.

       मो. ह. विद्यालयाच्या या प्रकल्पांना आपण, शिक्षणप्रेमी, हितचिंतक, शाळा आणि संस्था यांनी भरभरुन आर्थिक मदत केली. बदलत्या काळानुसार शाळेला आधुनिक रुप देण्यासाठी अजुनही आम्हांला तुमच्या आर्थिक मदतीची गरज आहे.

       आपण व आपली मित्रमंडळी यांच्याकडून आपण मो. ह. विद्यालयास आर्थिक मदत करु शकता, तसेच खालील उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता.

   १. दत्तक वर्ग योजना
   २. दत्तक विद्यार्थी / विद्यार्थीनी योजना
   ३. गरजू विद्यार्थी शैक्षणिक मंडळ
   ४. परदेशी भाषांचे वर्ग चालविणे
   ५. भाषाविषयक लॅब, गणिती लॅब यांची निर्मिती करणे.
   ६. ‘कमवा आणि शिकवा’ या योजनेत सक्रिय सहभाग देणे.

विद्यालयाबाबतची आपली सद्‌भावना गृहित धरून आम्हीं आपणांस शाळेशी संपर्क साधण्याचे आवाहन करत आहोत.

132
शाळेस पूर्ण वर्षे
150000
आजी-माजी विद्यार्थी
125
कार्यरत शिक्षक - शिक्षिका

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते. कारण, न सांगता जुळणार्‍या नात्यांची परीभाषाच काही वेगळी असते…

मोह परिवार