आनंद घैसास
निवृत्त वैज्ञानिक अधिकारी, खगोलशास्त्र ऑलिंपियाड विभाग, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई
चित्रकार, विज्ञान लेखक, कवी, नाट्यकलावंत, दिग्दर्शक, नेपथ्यकार, खगोलीय प्रकाशचित्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व
- जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबईयेथून उपयोजित कला आणि प्रकाशचित्रणाचे शिक्षण
- होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातील अनेक प्रकल्पातून केलेल्या सहभागामुळे विज्ञान शिक्षण या विषयाच्या अभ्यासाची सुरुवात आणि प्रत्यक्ष अनुभव
- विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्वसामान्यांचे – विज्ञान, गणित आणि खगोलशास्त्र विषयक लेखनातून, प्रयोगांच्या सादरीकरणातून, आकाशवाणी, दूरदर्शन वाहिन्यांच्या विविध कार्यक्रमातून – प्रबोधन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले आहे.
- आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिंपियाडसाठी भारतातून सहभाग घेणार्या विद्यार्थ्यांची प्रशिक्षण शिबिरे, संघनिवड प्रक्रिया, आकाशनिरीक्षणाचे अध्यापन आणि अंतिम स्पर्धेत जाणार्या भारतीय चमूंसोबत चीन, पोलंड आणि युक्रेन येथील स्पर्धांमध्ये वैज्ञानिक निरीक्षक आणि संघनेतृत्त्व अशी कामगिरी. भारतात झालेल्या खगोलशास्त्र ऑलिंपियाडसाठी समन्वयकाची कामगिरी.
- शाळा, महाविद्यालये आणि विविध संस्थांसाठी विज्ञान प्रयोग सादरीकरणाची प्रदर्शने, खगोल विषयक शिबिरे, व्याख्याने आणि रात्रभराचे आकाशदर्शनाचे कार्यक्रम.
- हसत खेळत विज्ञान ही चा व्हिडिओ सीडींची मालिका प्रसिद्ध झालेली आहे.
- पोगो चॅनलवर ‘एफएक्यू’ ही विज्ञानप्रयोगांची मालिका, डीडी नॅशनलवर ‘चमत्कार’ ही विज्ञान प्रश्नमंजुषेवर आधारित मालिका, तर नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर ‘सायन्स ऑफ स्मार्ट’ ही रोजच्या जीवनातील विज्ञान दाखवणारी मालिका. याचे लेखन आणि दिग्दर्शन.
- वर्तमानपत्रे, नियकालिकांमधून लेख, एक काव्यसंग्रह आणि विज्ञान विषयक 39 पुस्तके.
- यापैकी ‘दुर्बिणी आणि वेधशाळा’, ‘आकाश कसे पाहावे’, आणि ‘तार्यांचा जन्म आणि मृत्यू’ या तीन पुस्तकांना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उत्कृष्ट विज्ञान साहित्य निर्मितीसाठीचे ‘राजा केळकर आणि यदुनाथ थत्ते’ पुरस्कार
- ‘आपली सूर्यमाला’ या पुस्तकाला मराठी विज्ञान परिषदेचा उत्कृष्ट विज्ञान लेखनाचा ‘ह. मा. मोटे’ राज्यस्तरीय पुरस्कार
- भारतीय भौतिकशास्त्र महासंघाच्या पुणे विभागातर्फे विज्ञान प्रसार – प्रचारातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘मो. वा. चिपळोणकर’ पुरस्कार
- मो. ह. विद्यालय, ठाणे यांच्या 125 व्या वर्धापन दिनानिमित्त ‘विज्ञान शिक्षणातील उल्लेखनीय कामगिरीसाठी – जीवनगौरव पुरस्कार’
- सध्या मराठी विश्वकोशाच्या खगोलशास्त्र विभागाच्या नवीन नोंदीचे आणि पुनर्लेखनाचे काम पाहतात. विज्ञान विश्व या ‘विज्ञान प्रसार’च्या मराठी ऑनलाइन मासिकात ‘देखिले न डोळा’ हे सदर चालू आहे. गेल्या महिन्यात ‘डायनोसॉर’ आणि ‘विष्ठा’ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
- ‘परग्रह’, ‘मंगळावर वस्तीचे स्वप्न’, ‘अंतराळवीर व्हा’, आणि ‘अवकाश स्थानके’ ही चार पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर
हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु!
मोह सुविचार