रविंद्र कृष्णाजी तामरस सर
रविंद्र कृष्णाजी तामरस सर म्हणजे मो. ह. विद्यालयाला मिळालेली आणि मो. ह. वि. ने जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट या संस्थेला दिलेली एक ‘ग्रेट भेट’ आहे. त्यांच्या यशोगाथेत फक्त त्यांच्या वैयक्तिक यशाचीच नाही तर ओ. ह. वि. आणि संस्थेच्या विकासाची , यशाची गाथा दडलेली आहे.
1972 साली तामरस सर मो. ह. वि. त पदार्थ विज्ञानाचे शिक्षक म्हणून रुजू झाले. 1975 साली संस्थेने शाळेला जोडून महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि ते सुरू करण्यात, ते नावारुपाला आणण्यात आपला सिंहाचा वाटा आहे.
तीव्र बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा, सचोटी, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती या आपल्या गुणांची दखल संस्थेने घेतली आणि 1992 ते 1998 या कालावधीत आपणास संचालक मंडळात शिक्षक – प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली 1998 ते 2003 पर्यंत आपण संस्थेमध्ये कार्यवाह म्हणून ज्बाबदारी पार पाडलीत. 2007 ते आत्तापर्यंत आपण संस्थेचे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडित आहात.
आपण कोषाध्यक्ष म्हणून रुजू झाल्यावर सर्व आर्थिक व्यवहारांचे संगणिकिकरण केले. त्यासाठी आपण स्वत: संगणक शिकलात. आपल्या कारकिर्दितच संस्थेच्या बहुतेक सर्व इमारतींचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले. कोट्यावर्धींची उलाढाल करतानाही आपल्यामुळे त्या सर्व आर्थिक व्यवहारात पारदर्शकता होती.
आपल्या कोषाध्यक्षांच्या कारकिर्दितच महिन्याच्या महिन्याला सर्व शाळांचा फी चा हिशोब घेतला जाऊ लागला. संपूर्ण संस्थेच्या सर्व शाळांच्या जमाखर्चाचे एकत्रीकरण करण्याचे काम आपण करता आणि म्हणूनच एका क्लीकवर सर्व शाळांचा जमा-खर्च दिसतो.
आणि म्हणूनच तामरस सर म्हणजे ज. ए. ए. चे आणि मो. ह. वि. चे भीष्म पीतामह म्हणून ओळखले जातात.