Back

श्री. मोहम्मद नुबैरशाह सलीमशाह शेख

IM - आंतरराष्ट्रीय मास्टर (चेस)

मो. ह. विद्यालयाच्या अनेक प्रथितयश, प्रसिद्ध माजी विद्यार्थ्यांची परंपरा पूढे चालू ठेवणारा मो. ह. विद्यालयाचा एक मानबिंदू म्हणजे आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू मोहम्मद नुबैरशाह शेख होय!!!

वयाच्या सातव्या वर्षापासून त्याने बुद्धीबळ खेळल्यास सुरुवात केली. वयाच्या अठराव्या वर्षी जागतिक बुद्धीबळ संघटनेकडून खेळण्यास सुरुवात केली. वयाच्या अठराव्या वर्षी जागतिक बुद्धीबळ संघटनेकडून त्याला “आंतरराष्ट्रीय मस्टर” हा किताब मिळाला.

ऑक्टोबर 2016 मध्ये राजमुंद्री (आंध्रप्रदेश) येथे राष्ट्रीय ज्युनिअर बुद्धीबळ स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. सन 2017 मध्ये होणार्‍या जागतिक आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघातून निवड झाली.

वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने आशियाई, जागतिक युवा बुद्धीबळ स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. आजपर्यंत जागतिक आशियाई व राष्ट्रकुल स्पर्देह्त त्याला भारतात 3 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्य पदके मिळाली आहेत. सहा राष्ट्रीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड झालेला तो महाराष्ट्रात्ल एकमेव खेळाडू!!! या स्पर्धेत त्याने 2 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक मिळवून दिले. वयाच्या बाराव्या वर्षी त्याने महाराष्ट्र राज्य खुली अजिंक्य स्पर्धा जिंकली.

2004 ते 2016 पर्यंत 11 राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे अजिंक्यपद आणि राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत सुवर्ण पदक, राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत 3 रौप्यपदके मिळविली आहेत. सन 2015 मध्ये प्रथम आंतरराष्ट्रीय खुल्या रॅपिड बुद्धीबळ स्पर्धेचा तो विजेता आहे.

जून 2022 मध्ये झालेल्या प्रतिष्ठीत सिल्व्हर गेम ग्रॅंडमास्टर खुल्या बुद्धीबळ स्पर्धेचा तो विजेता आहे.

मे – 2022 मध्ये झालेल्या LBHM पाचव्या ऑल इंडिया ओपन FIDE रेटिंग बुद्धीबळ विजेता, फेब्रुवारी 2023 मध्ये FIDE (वर्ल्ड चेस फेडरेशन) चे त्याचे रेटिंग 2414 असे आहे. आत्तापर्यंत 400 विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून 3571 सामने खेळण्याचा त्याला प्रदीर्घ अनुभव आहे. आत्तापर्यंत त्याने 16 जागतिक स्तरावरची आंतरराष्ट्रीय पदके (6 सुवर्ण, 7 रौप्य, 6 कांस्य)  पटकावली आहेत.

जानेवारी 2018मध्ये त्याला यशवंतराव चव्हाण राज्य “युवा क्रिडा पुरस्कार – 2017” देऊन सन्मानित करण्यात आले. फेब्रुवारी 2018 मध्ये त्याला “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार 2016 – 17” हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अशा या मो. ह. विद्यालयाच्या हिर्‍याचा मो. ह. वासियांना सार्थ अभिमान आहे.

हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु!

मोह सुविचार