क्रीडा अहवाल
माध्यमिक विभाग : इयत्ता 5 वी ते 10 वी
विद्यार्थ्यांमधील सुप्त क्रीडागुणांना वाव देण्यासाठी
मो. ह. विद्यालयाकडुन उत्तेजनपर नियोजनबद्ध प्रयत्न केले जातात. याचेच फलीत म्हणजे मो. ह. विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना मिळालेले स्पृहणीय यश. या प्रयत्नांवर आणि प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांवर एक दृष्टीक्षेप
- शालेय शिक्षण तासाला विद्यार्थ्यांना सर्वांगसुंदर व्यायाम प्रकार, लेझीम संचलन, ॲरोबिक्स, कवायत, कबड्डी, डॉजबॉल, बास्केटबॉल आणि योगासने यांचे शिक्षण दिले जाते.
- शाळेची क्रीडा प्रबोधिनी आहे. त्या अंतर्गत मल्लखांब व योगासने यांचे प्रशिक्षण सोमवार ते शुक्रवार सध्या 5.30 ते 7.00 या वेळेत प्रशिक्षक श्री. किशोर म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली होते, तर सोम, मंगळ व शनि या दिवशी सकाळी 10.30 ते 12.00 या वेळेत प्रशिक्षक श्री. बाळा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली इ. 6 वी ते इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी लाठीकाठी चे प्रशिक्षण दिले जाते.
- 26 जानेवारी दिवशी लेझीम, पिरॅमीड्स, मल्लखांब, संचलन, कवायत यांचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले जाते.
DSO मार्फत (जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय) या शासनामार्फत घेण्यात येणार्या सांघिक व वैयक्तिक खेळांच्या स्पर्धात 14 व 17 वयोगटात पूढीलप्रमाणे यश मिळवले आहे.
ॲथलेटिक्स –
400 मी धावणे : कु. साक्षी नितीन पाटील (इ. 10 वी) : राज्यस्तरीय सहभाग
1000 मी स्प्रींट मिडले : कु. साक्षी नितीन पाटील : द्वितीय क्रमांक
योगासने –
कौशिक विजय राजगुरू (इ. 8 वी ) : विभाग स्तरावर निवड
स्वराज संदीप ठाकरे (इ. 9 वी) : विभाग स्तरावर निवड
मल्लखांब –
कु. शौर्य विजय राजगुरू (इ. 5 वी) : विभाग स्तरावर निवड
कु. स्वराज संदीप ठाकरे (इ. 9 वी) : विभाग स्तरावर निवड
कु. पायल विजय चौधरी (इ. 6 वी) : विभाग स्तरावर निवड
कु. रूद्र अतुल टिकेकर (इ. 9 वी) : विभाग स्तरावर निवड
इतर अनेक स्पर्धांमध्ये मो. ह. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे तसेच प्राविण्य प्राप्त केले आहे –
- साने गुरूजी आरोग्यमंदिर राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा
- चिंतामणी भायखळा राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा
- ठाणे एकलव्य मल्लखांब स्पर्धा
- मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा
- D. S. O. कबड्डी स्पर्धा
- क्रिकेट सामने
- खो-खो
- जलतरण स्पर्धा
शाळेतील नामांकित खेळाडू
कु. एकेंद्र जयबहादूर दर्जी-
2007-2015 : 5 वी ते 12 वी
खेळ – बॅडमिंटन (एकेरी) खेळातील प्राविण्य
- 2010 (पुणे) राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन चॅम्पियनशीप उपविजेता
- 2012-13 (आंध्र प्रदेश) – 58 वी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा – प्रथम विजेता
- 2014-15 – राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन चॅम्पियनशीप (नाशिक) तृतीय क्रमांक
कु. सागर विजयकुमार डोंबे –
1993-1999 : 5 वी ते 10 वी : खेळ – खो खो / कॅरम
- 1998 – राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशीप उपविजेता
- 1995 – 2002 – 8 वेळा राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत सहभाग व जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक
- 2000-2003 – आंतर महाविद्यालयीन कॅरम स्पर्धा विजेता (3 वेळा)
कु. आकाश नवनाथ शिंदे –
- 2012-2018 – 7 वी ते 12 वी
2015 ते 2018 – 4 वेळा राज्यस्तरीय उंच उडी स्पर्धेत सुवर्ण पदक - 2015 ते 2017 – सलग चार वर्षे राष्ट्रीय स्तरावर सहभाग
- 2015 – झारखंड रांची – 1.70 m
- 2016 – केरळ – 1.85 m
- 2017 – महाराष्ट्र – 1.90 m
कु. तेजस सुहास कारखानिस –
- 1990 – 2004 – मोठा शिशू ते 12 वी सायन्स
- 2003 – ऑल इंडिया आंतर विभागीय राष्ट्रीय खेळ (भोपाळ) येथे स्पर्धेत 110 मी. अडथळा शर्यतीत रौप्य पदक
- 2004 – ऑल इंडिया आंतर विभागीय राष्ट्रीय खेळ स्पर्धा (मेरठ) 110 मी. अडथळा शर्यतीत रौप्य पदक
- 2006 – ऑल इंडिया आंतर विभागीय राष्ट्रीय खेळ स्पर्धा (अलाहाबाद) 110 मी अडथळा शर्यत (हर्डल्स) सुवर्ण पदक
- 2003 – ठाणे महानगरपालिकेचा खंडू रांगणेकर पुरस्कार
- 2004 – मुंबई विद्यापिठाचा Fastest man पुरस्कार
कु. साक्षी नितीन पाटील –
- 2013-2023 – इ. 1 ली ते 10 वी
- 2014 – पूणे मेयर ट्रॉफी राज्य स्तरीय स्पर्धेत 50 मी. धावणे – प्रथम क्रमांक / सुवर्ण पदक
100 मी धावणे – द्वितीय क्रमांक / रौप्य पदक - 2016 – सब ज्युनिअर पुणे राज्य स्तरीय स्पर्धेत
200 मी धावणे – सुवर्ण पदक
80 मी धावणे – रौप्य पदक - 2018 – (कळंबोली) राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत 300 मी. धावणे. कांस्य पदक 4 x 100 -रिले – कांस्य पदक
- 2019 – महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर क्रीडा स्पर्धेत 100 मी. धावणे. रौप्य पदक 4 x 100 मी रिले सुवर्ण पदक 55.7 रेकॉर्ड (राज्यस्तरीय)
- 2022 – महाराष्ट्र राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा (नाशिक) 1000 मी स्प्रीन्ट मिडले रिले. स्पर्धेत रौप्य पदक
- 2023 – बॉम्बे वाय. एम. सी. ए. (मरीन लाइन्स) क्रीडा स्पर्धेत
100 मी. धावणे. – सुवर्ण पदक
200 मी. धावणे – सुवर्ण पदक
4 x 100 मी रिले – सुवर्ण पदक - 2023 – राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा
200 मी. धावणे – सहभाग
क्रीडा अहवाल
ज्युनिअर कॉलेज ठाणे
2022 - 23 या शैक्षणिक वर्षात झालेल्या अनेक स्पर्धांमध्ये खेळाडुंनी सहभाग घेऊन विविध स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यात D. S. O. आणि संघटनाच्या स्पर्धांचा समावेश आहे.
DSO मार्फत (जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय) या शासनामार्फत घेण्यात येणार्या सांघिक व वैयक्तिक खेळांच्या स्पर्धात 14 व 17 वयोगटात पूढीलप्रमाणे यश मिळवले आहे.
श्रृती अनिल महाकाळ-पाटील (इ. 12 वी) –
कराटे U 19 DSO जिल्हास्तरीय – सिल्व्हर मेडल
य़ूडोकन कप 2022 – दुबई 1 रौप्य, 1 कांस्य
8 वी गोवा आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप – गोवा 2 – सुवर्ण
26 वी भारत राष्ट्रीय स्तरावरील खुली कराटे चॅम्पियनशिप 2022 ठाणे 1 रौप्य, 1 कांस्य
32 वी युरो आशिया इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप 2 सुवर्ण
ग्रॅंड चॅम्पियनशिप सहभाग
श्रद्धा दिलीप बोरसे (इ. 11 वी) –
कराटे U-19 वजन गट 64-68
D. S. O. जिल्हास्तरीय
– विभागीय – सुवर्ण
– राज्यस्तरावर रौप्य सहभाग
सिद्धी किरण महाकाळ (इ. 11 वी) –
किक बॉक्सिंग D. S. O. U-19 कांस्य पदक
19 वी ओपन राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप – 2023 सहभाग