विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव
पर्यावरण दक्षता मंडळातर्फे वर्षभर पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक जाणिवा निर्माण होतात.
'माझा तलाव' या मोहिमेत मो. ह. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग.
शाळेत मल्लखांब, कबड्डी, खो-खो या खेळांच्या कोचिंगद्वारे उत्तम क्रीडापटू घडविण्याकडे वाटचाल
विविध पातळ्यांवर विज्ञान प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्याकरिता जाणीवपूर्वक मो. ह. विद्यालयाकडुन प्रयत्न केले जातात. दरवर्षी इयत्ता ७ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांचे Elementary व Intermediate या सरकारी बोर्डच्या चित्रकला परीक्षा होतात. परीक्षेसाठी भरपूर विद्यार्थी सहभागी होतात.
१९९९ या वर्षी कुमारी किर्ती कदम या विद्यार्थिनीने चित्रकलेच्या परीक्षेत बोर्डात येण्याचा मान मिळवला.
संस्थेच्या विविध स्पर्धा होतात. 'कै. श्री. श्री. ज. बापट वक्तृत्व स्पर्धा', तसेच 'एन. टी. केळकर स्मृती चित्रकला स्पर्धा' दरवर्षी होतात. स्पर्धेमध्ये संस्थेच्या सर्व शाळांतील भावी चित्रकार सहभागी होतात. तसेच, दरवर्षी 'मुंबई सकाळ' वृत्तपत्र 'चित्रकला स्पर्धे'चे आयोजन करते. त्या स्पर्धेमध्ये भरपूर विद्यार्थी सहभागी होतात.
विद्यार्थ्यांच्या शालेय स्तरावर चित्रकला, रांगोळी, मुखपृष्ठ, भित्तीचित्र या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव दिला जातो.
एप्रिल महिन्यात अभिरूची मंडळ व मो. ह. विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला, नृत्य, नाट्य, शिल्प, कागदकाम यांसारख्या विविध कला 'छंद वर्ग' ह्या शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना शिकविल्या जातात. त्यांचा छंद जोपासला जातो.