Back

वारसा मुल्यांचा...!

कै. गो. ना. अक्षीकर

‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.’ हे ब्रीदवाक्य धारण करणार्‍या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, म्हणजे ज. ए. इ. ची स्थापना २४ एप्रिल १८९२ रोजी कै. अक्षीकरांच्या अधिपत्याखाली झाली. कै. गोपाळ नारायण अक्षीकर हे या संस्थेचे आद्य संस्थापक होत.

कै. गो. ना. अक्षीकरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत १८९२ साली राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन दादर येथे  जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट शाळेची स्थापना केली. तिथेच जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट या संस्थेचे डेरेदार वृक्षात रुपांतर झाले. आज ४५ शाळा व हजारो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संस्था वृद्धिंगत होत आहे. सुरुवातीस केवळ मराठी माध्यमाच्या शाळा असणार्‍या या संस्थेने, कालानुरुप इंग्रजी माध्यमाच्या CBSE BOARD, International School, कनिष्ठ महाविद्यालये, तसेच S. N. D. T. च्या सहकार्याने महिला महाविद्यालय असा दमदार विस्तार केला आहे. पण हे सर्व साधत असताना अन्य अनेक संस्थेत दिसणार्‍या साम्राज्यवादी वा केवळ व्यापारी कल्पनांना मात्र, या संस्थेने कटाक्षाने दूर ठेवले आहे व तेच तिचे एक बलस्थान आहे. दुसरे म्हणजे व्यवस्थापनात शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा सहभाग. त्यामुळेच संस्थेचा कारभार लोकशाहीशी अधिक सुसंगत आहे असे वाटते.

संस्थेने आजवर महाराष्ट्राला अनेक दिग्गज, गुणवान, सुसंस्कृत व सुजाण नागरिक, यशस्वी विद्यार्थी दिले. विविध क्षेत्रात हे विद्यार्थी आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत.

पण केवळ ऐतिहासिक वारशावर समाधान न मानता, ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे’ अशी वृत्ती न बाळगता संस्थेने वर्तमान व अपेक्षित भविष्याशी सुसंगत अशा अनेक योजना राबविण्यास सुरुवत केली आहे. गेल्या १३२ वर्षांप्रमाणे येणारी अनेक वर्षे ही संस्था वाटचाल करत राहिल.

Schools conducted by the G. E. Institute

132
शाळेस पूर्ण वर्षे
150000
आजी-माजी विद्यार्थी
125
कार्यरत शिक्षक - शिक्षिका

जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदला.

महात्मा गांधी