ध्येय
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत, अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून, विज्ञान तंत्रज्ञानाची कास धरून, नीतीमूल्यांची जपणूक करत आदर्श सुसंस्कारित, सुजाण नागरिक घडविणे.
भविष्यकालीन महत्त्वपूर्ण योजना
- स्पर्धात्मक परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्ग
- सुसज्ज अद्ययावत अत्याधुनिक सेवा-सुविधांनी युक्त क्रीडा प्रबोधिनी; क्रीडा-प्रबोधिनीच्या माध्यमातून नजीकच्या काळात राज्यपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कीर्तिवंत खेळाडू तयार करणे.
- आयआयटी - कोचिंगसाठी व्हर्च्युअल क्लासरूम
- परदेशी भाषा वर्ग - जर्मन, फ्रेंच, लॅटीन मार्गदर्शक वर्ग
- गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन
- मराठी व इंग्रजी भाषा विकासासाठी व्याख्यानमाला
उद्दिष्टे
- शाळेचे कार्यालयीन व इतर कामकाज पुर्णत: संगणकीय करणे.
- शाळेत इंग्रजी संभाषणाचे वर्ग इ. १ ली ते १० वी पर्यंत सुरू करणे.
- विषयानुरुप वेगवेगळ्या प्रयोगशाळांची निर्मिती करणे. जसे, गणिती लॅब, भूगोल लॅब, भाषा लॅब इ.
- Earn and Learn या सूत्रीचा वापर करुन, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीप्रमाणे कौशल्यानुसार व्यावसायिक कोर्सेस उपलब्ध करुन देणे.
- जुन्या पंतोजी स्टाईल शिक्षणपद्धतीचा अवलंब न करता Collaborative learning पद्धतीचा अवलंब करणे.
- डिजिटल लायब्ररी तयार करुन शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग वाढविणे.
- शाळेसाठी सोलार प्रकल्प
- माजी शिक्षक - विद्यार्थी संघ पुनर्जीवित करणे.
- मो. ह. विद्यालयाशी संलग्न CBSE शाळेसाठी स्वतंत्र जागा घेऊन त्यावर स्वतंत्र शाळेची इमारत बांधणे.
132
शाळेस पूर्ण वर्षे
150000
आजी-माजी विद्यार्थी
125
कार्यरत शिक्षक - शिक्षिका
मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम